पाटणा : परदेशातून आलेल्या एका व्यक्तीचा बिहारच्या बोधगयामधील विलगीकरण केंद्रामध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, ही व्यक्ती देशात परतून दोनच दिवस झाले होते. विकी असे या व्यक्तीचे नाव होते. तो गोपालगंज जिल्ह्याचा रहिवासी होता.
सौदी अरेबियाच्या जेद्दाहमधून तीन जूनला विकी भारतात परतला होता. त्यानंतर त्याला बोधगयामधील विलगीकरण केंद्रामध्ये रुपांतरीत केलेल्या एका मठामध्ये ठेवण्यात आले होते. या मठाच्या छतावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासणीनुसार, मानसिक तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचे दिसून येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी दिली.