चेन्नई -थायलँडहून प्राण्यांची तस्करी करून भारतात आणल्यामुळे एकाला चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. यामध्ये विविध प्रजातींचे उंदीर आणि सरड्यांचा समावेश होता.
कस्टम विभागाला बेनामी सूत्रांकडून या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे रविवारी विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला २८ वर्षांचा मोहम्मद मोईदीन हा जेव्हा विमानतळाबाहेर जात होता. तेव्हा त्याच्या एकूण हालचालींवरून सुरक्षा अधिकाऱ्यांचा संशय वाढला. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, त्याच्याकडून हे प्राणी जप्त करण्यात आले.