कोलकाता- नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा ३० मे सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे होणार आहे. मोदींसोबत इतर मंत्रीही यावेळी शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत.
ममता बॅनर्जी म्हणतात, नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला राहणार उपस्थित - ममता बॅनर्जी
ममता म्हणाल्या, मी देशातील इतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करुन शपथविधीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ममता म्हणाल्या, हा देशाचा औपचारिक सोहळा असल्यामुळे मी इतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करुन शपथविधीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. आज (मंगळवार) तृणमूल काँग्रेसच्या २ आमदारांसह ५० ते ६० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांत तणावपूर्व वातावरण आहे. तरीही ममता यांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. भाजपने बंगालमध्ये चांगली कामगिरी करताना ४२ पैकी १८ जागा जिंकत चांगलीच मुसंडी मारली होती. तृणमूलच्या खासदारांची संख्या २०१४ च्या ३४ च्या तुलनेत २२ खासदारांवर आली होती.