महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही - ममता बॅनर्जी - गुजरात

भाजप एका कटानुसार बंगालमधील दार्जिलिंग आणि जंगलमहल भागात हिंसाचार घडवून आणत आहे. हा सर्व एक सुनियोजित कट असून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.

अमित शाह आणि ममता बॅनर्जी

By

Published : Jun 11, 2019, 12:46 PM IST

कोलकाता - गेल्या शनिवारी झालेल्या हिंसाचारात भाजपचे ५ जण मारले गेल्याचा दावा खोटा आहे. या हिंसाचारात केवळ दोघांचा मृत्यू झाला आहे. भाजप हिंसाचाराच्या घटनांच्या खोट्या बातम्या देऊन आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ममता म्हणाल्या, केंद्रीय मंत्रालयाकडून पत्रे पाठवली जात आहेत. परंतु, याद्वारे पडद्यामागून खेळी केली जात आहे. केंद्राला राज्याच्या सचिवांनी याआधीच उत्तर दिले आहे. ते (भाजप) सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्यासाठी कोटींच्या घरात पैसे खर्च करत आहेत. केंद्र सरकार आणि (भाजप) कार्यकर्ते राज्यात हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांच्या इशाऱ्यावर भाजप एका कटानुसार बंगालमधील दार्जीलिंग आणि जंगलमहल भागात हिंसाचार घडवून आणत आहे. हा सर्व एक सुनियोजित कट असून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, भाजपने आगीशी खेळू नये. त्यांना माहित आहे, देशात एकमात्र ममता बॅनर्जी त्यांच्याविरोधात उभी राहिली आहे. आमचे सरकार पाडण्याचे त्यांचे प्रयत्न सफल होणार नाहीत.

ममतांनी माध्यमांवर टीका करताना म्हटले, की भाजपच्या इशाऱ्यावर चुकीच्या माहिती प्रसारित करत बंगालचा अपमान केला जात आहे. २०२१ च्या आधी विधानसभा निवडणुका होणार, अशा बातम्या साफ खोट्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details