महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममतांनी मंत्रिमंडळात केले फेरबदल - मुख्यमंत्री

भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारताना १८ जागांवर विजय मिळवत तृणमूलसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे राज्यात होणारी पक्षाची पडझड रोखण्यासाठी ममतांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जी यांची पत्रकार परिषद

By

Published : May 28, 2019, 11:38 PM IST

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात बदल केले आहेत. आज (मंगळवार) तृणमूल काँग्रेसचे २ आमदार आणि जवळपास ६० पेक्षा जास्त नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत पक्षाची पिछेहाट झाल्यामुळे ममतांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. २०१४ साली ३४ खासदारांची संख्या २०१९ साली २२ वर आली आहे. तर, भारतीय काँग्रेसला राज्यात फक्त २ जागा मिळाल्या आहेत. डाव्यांना राज्यात एकही जागा मिळाली नाही. भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारताना १८ जागांवर विजय मिळवत तृणमूलसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे राज्यात होणारी पक्षाची पडझड रोखण्यासाठी ममतांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालचे नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळ

  • सुवेंदु अधिकारी - जलसंपदा आणि वाहतुक मंत्री
  • सोमेन महापात्रा - आरोग्य, इंजिनिअरिंग आणि पर्यावरणमंत्री
  • रजीब बॅनर्जी - आदिवासी विकास मंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details