महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजप छी छी..! ममतांनी दिल्या भाजपसह सीएए, एनआरसी विरोधात घोषणा

हे आंदोलन आपल्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे ममता यांनी स्पष्ट केले. सरकार जेव्हा उत्तर प्रदेशमधील आंदोलकांना रोखू शकले नाही, तेव्हा सरकारने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. २९ डिसेंबरला सिलिगुरी गावात मी जाणार आहे, तसेच ३० डिसेंबरला तिथे आंदोलन करेल, असेही त्या म्हणाल्या.

Mamata raises slogans against BJP, CAA, NRC at rally in Kolkata
ममतांनी दिल्या भाजप, सीएए अन् एनआरसी विरोधी घोषणा

By

Published : Dec 25, 2019, 10:53 AM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकातामध्ये एका मोर्चादरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि भाजप विरोधी घोषणा दिल्या. 'भाजप छी छी.., सीएए छी छी.., एनआरसी नही चलेगा' अशा घोषणा त्यांनी दिल्या. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

ममतांनी दिल्या भाजप, सीएए अन् एनआरसी विरोधी घोषणा

आसाममध्ये केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून बंदी-छावणी उभारण्यात आली आहे. मात्र, कोलकातामध्ये तसे काही नाही. हे आंदोलन आपल्या हक्कांच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे ममता यांनी स्पष्ट केले. सरकार जेव्हा उत्तर प्रदेशमधील आंदोलकांना रोखू शकले नाही, तेव्हा सरकारने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. २९ डिसेंबरला सिलिगुरी गावात मी जाणार आहे, तसेच ३० डिसेंबरला तिथे आंदोलन करेल, असेही त्या म्हणाल्या.

ममता पुढे म्हटल्या, की देश हा भाजपच्या इच्छेनुसार चालणार नाही. सीएए जोपर्यंत मागे घेण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. आम्ही पश्चिम बंगालमध्ये आणि देशामध्येही फूट पडू देणार नाही. आम्ही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडू देणार नाही.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये ममता सर्वात पुढच्या स्थानी आहेत. मागील आठवड्यातही त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते.

हेही वाचा : 'शरद पवारांच्या महाराष्ट्रातील लढ्याकडून मिळाली प्रेरणा'

ABOUT THE AUTHOR

...view details