बसिरहाट (बंगालमधील) - ममता दीदीनी दोन दिवसांपूर्वाच जाहीर केले होते, की त्या बदला घेणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीवर हल्ला करुन २४ तासांत त्यांनी त्यांचा बदला घेण्याचा निश्चय पूर्ण केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील बसिरहाट येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. या सभेत त्यांनी मंगळवारी अमित शाह यांच्या सभेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच या घटनेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार ठरवले.