कोलकाता - एक्झिट पोलवर चर्चा करुन ईव्हीएम मशीनमध्ये बदल करणे किंवा ते बदलण्याचा डाव असल्याचा आरोप ममता यांनी केला. हे युध्द एकत्र येऊनच जिंकता येणार आहे. यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
एक्झिट पोलची चर्चा करुन ईव्हीएम बदलण्याचा डाव - ममता बॅनर्जी - manipulate
एक्झिट पोलवर चर्चा करुन ईव्हीएम मशीनमध्ये बदल करणे किंवा ते बदलण्याचा डाव असल्याचा आरोप ममता यांनी केला.
ममता बॅनर्जी
लोकसभा निवडणुकीतील सातवा व शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला. या टप्प्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. या एक्झिट पोलच्या चर्चांवर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.