महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सोनभद्र भेटीप्रकरणी ममता बॅनर्जींकडून प्रियांका गांधींचे समर्थन - कोलकाता

तृणमूल काँग्रेसच्या शिष्ठमंडळाला उत्तरप्रदेशातील सोनभद्रला जाण्यापासून रोखल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर टीका केली.

ममता बॅनर्जीं

By

Published : Jul 21, 2019, 5:13 AM IST

Updated : Jul 21, 2019, 7:25 AM IST

कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या शिष्ठमंडळाला उत्तरप्रदेशातील सोनभद्रला जाण्यापासून रोखल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर टिका केली. त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालच्या भाटपाडा येथे हिंसाचार झाला तेव्हा भाजपच्या शिष्ठमंडळाने तातडीने त्या ठिकाणी भेट दिली. मात्र, आता भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये तृणमूलच्या शिष्ठमंडळाला सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटायला जाण्यापासून रोखले जात आहे. भाजपने कायद्याचे पालन केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे समर्थन सोनभद्रला जाऊन त्यांनी काही चूक केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या शिष्ठमंडळाला बाबतपूर (वाराणसी) विमानतळावर अडवल्यानंतर शिष्ठमंडळाने विमानतळावरच ठिय्या मांडला होता. त्यांनंतर प्रशासनाने शिष्ठमंडळातील तिघांना विमानतळाबाहेर सोडले आणि सोनभद्रत घटनेतील जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयात जाऊ दिले.

Last Updated : Jul 21, 2019, 7:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details