कोलकाता - आरोग्य सेवा देणाऱ्या एका नर्सला तिच्या परिसरातील लोकांनी तिला तिच्याच घरात राहण्यास विरोध केला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिला सरकारी फ्लॅट भाडेतत्वावर उपलब्ध करून दिला. तसेच असे करणाऱ्या लोकांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तुरुंगात टाकले जाऊ शकते, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
नर्सला कुटुंबीयांसोबत राहण्यास स्थानिकांचा विरोध, ममता बॅनर्जी यांनी दिला सरकारी फ्लॅट - कोलकाता न्युज
राणाघाट येथील एक नर्स आपले कर्तव्य पार पाडून घरी जात होती. मात्र, तिच्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल या भीतीमुळे तिच्या परिसरातील लोकांनी तिला तिच्या कुटुंबीयांसोबत राहण्यास विरोध केला.
राणाघाट येथील एक नर्स आपले कर्तव्य पार पाडून घरी जात होती. मात्र, तिच्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल या भीतीमुळे तिच्या परिसरातील लोकांनी तिला तिच्या कुटुंबीयांसोबत राहण्यास विरोध केला. हा प्रकार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समजताच त्यांनी अशा लोकांना कारवाई करण्याचा इशारा दिला. त्या म्हणाल्या, की या जगात लोकांची मानसिकता इतकी खालावलेली कशी काय असू शकते? त्याठिकाणी तिचं कुटुंब आहे, तर तिच्या कुटुंबापासून तिला तोडण्याचा अधिकार स्थानिकांना नाही. तसेच हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे कारमध्ये रात्र काढणाऱ्या डॉक्टरांबद्दल देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.