महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अनलॉक 1.0 : राजधानी दिल्लीत सोमवारपासून मॉल्स, शॉपिंग सेंटर सुरू होणार

दिल्लीमध्ये सुमारे 100 मोठी आणि छोटी शॉपिंग मॉल्स आहेत. दिल्ली सरकारला यातून सुमारे 500 कोटींचा महसूल मिळतो, असे आम आदमी पक्षाच्या व्यापार संघटनेचे निमंत्रक ब्रिजेश गोयल यांनी सांगितले.

दिल्लीतील मॉल उघडली जाणार
दिल्लीतील मॉल उघडली जाणार

By

Published : Jun 7, 2020, 6:41 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील मॉल आणि शॉपिंग सेंटर दोन महिन्यांहून अधिक काळानंतर सोमवारपासून पुन्हा उघडली जात आहेत. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन वारंवार निर्जंतुकीकरण, खरेदी दरम्यान गर्दी टाळणे, शारीरिक सुरक्षित अंतर राखण्यावर कटाक्षाने लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

दिल्लीमध्ये सुमारे 100 मोठी आणि छोटी शॉपिंग मॉल्स आहेत. दिल्ली सरकारला यातून सुमारे 500 कोटींचा महसूल मिळतो, असे आम आदमी पक्षाच्या व्यापार संघटनेचे निमंत्रक ब्रिजेश गोयल यांनी सांगितले.

बाजारातील दुकानांच्या तुलनेत मॉलमधील व्यवसायाचे कार्य अधिक संयोजित पद्धतीने केले जाते. दिल्लीतील शॉपिंग मॉल्समध्ये जवळपास १०,००० लोक काम करतात. मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या व्यवस्थापनाने दुकान, कार्यालय आणि रेस्टॉरंट मालकांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बर्‍याच मॉल्सनी लोकांचे सामान निर्जंतुकीकरणासाठी यूव्ही निर्जंतुकीकरण कक्ष स्थापित केले आहेत.

मॉल्स लोकांसाठी उघडण्यापूर्वी एक तास अगोदर आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना अहवाल देण्यास सांगितले आहे. अनिवार्य तपासणीनंतर कर्मचार्‍यांना फेस-शील्ड, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर दिले जातील, असे द्वारका येथील वेगास मॉलचे संचालक हर्षवर्धन बन्सल म्हणाले.

दुकाने, रेस्टॉरंट्स आणि कार्यालये यांना दरवाजे उघडे ठेवण्यास सांगितले गेले आहे. कारण डोर्नकोब्स किंवा हँडल्ससारख्या सामान्य पृष्ठभागामुळे संसर्ग पसरू शकताे. लिफ्टची वहन क्षमता 25 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. एस्केलेटरवरही प्रवाशांना अंतर राखून ठेवावे लागेल, असेही बन्सल यांनी सांगितले.

मॉलला भेट देणाऱ्यांनी मास्क घातला पाहिजे आणि त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप्लिकेशन असले पाहिजे. गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही. मॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात कॉन्टॅक्टलेस सॅनिटायझर डिस्पेन्सर ठेवण्यात आले आहेत. दिवसातून दोनदा संपूर्ण संकुल स्वच्छ केले जातील. सर्वसाधारण भागात दर तासाला निर्जंतुकीकरण केले जाईल. कपड्यांच्या विभागात डमी शर्ट चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील आणि प्रत्येक उपयोगानंतर स्वच्छता होईल, असेही बन्सल म्हणाले.

पिंपमपुरा येथील डी मॉलचे संचालक मनमोहन गर्ग म्हणाले की, संकुलातील धातूचा पृष्ठभाग आणि सामान्य भाग नियमितपणे निर्जंतुकीकरण केले जातील. थर्मल स्कॅनर आणि सॅनिटायझर प्रवेशद्वारांवर ठेवण्यात आली आहेत. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांना आत प्रवेश दिला जाणार नाही. सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. गर्भवती महिला आणि 10 वर्षांखालील व 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच इतर अनेक मॉल, शॉपिंग सेंटर चालकांनी कोरोना प्रसार होऊ नये, यासाठी पूर्ण खबरदारी घेणार असल्याचे सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details