जयपूर- महाराष्ट्र काँग्रेसच्या संदर्भातला सर्व निर्णय सोनिया गांधी घेतील आणि तोच निर्णय अंतिम राहील, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे. तो जयपूर येथ बोलत होते. जनतेने भाजप शिवसेनेला सत्तेत बसण्याचे बहुमत दिले असून आम्हाला विरोधीपक्षात बसण्याचे जनमत दिले आहे. त्यामुळे युतीने सरकार स्थापन करावे, अम्ही विरोधीपक्षाची भूमिका पार पाडू, असेही खर्गे यावेळी म्हणाले. तसेच हायकमांड जो निर्णय घेतील त्यानुसार तो मान्य असले असेही त्यांनी सांगितले.
अंतिम निर्णय हायकमांडच घेतील, तो मान्य असेल - मल्लिकार्जुन खर्गे - congress mlas
महाराष्ट्र काँग्रेसच्या संदर्भातला सर्व निर्णय सोनिया गांधी घेतील आणि तोच निर्णय अंतिम राहील, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -LIVE : सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग.. शरद पवार बैठकीसाठी रवाना
राज्यातील काँग्रेसचे सर्व आमदार हे जयपुरमधील ब्यूना विस्टा रिसोर्टमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्याठिकाणी त्यांची भेटीगाठी घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची रेलचेल सुरू आहे. मलिलकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या आमदारांची रिसोर्टमध्ये भेट घेऊन चर्चाही केली आहे. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही रविवारी रात्री या सर्व आमदारांसोबत डिनर करत चर्चा केली आहे.