महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकच्या प्रत्येक कुरघोडीला भारत जोरदार प्रत्युत्तर देणार - जनरल बिपीन रावत - कारगिल

पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही चुकीला माफ केले जाणार नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक कुरघोडीला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. सीमेवरील कोणत्याही दहशतवादी कृत्याला खपवून घेतले जाणार नाही, असे बिपीन रावत म्हणाले.

बिपीन रावत

By

Published : Jul 13, 2019, 7:49 PM IST

नवी दिल्ली - कारगिल युद्ध विजयाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने बोलताना मेजर जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला इशारा देताना म्हणाले, पाकिस्तानच्या प्रत्येक कुरघोडीला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. सीमेवरील कोणत्याही दहशतवादी कृत्याला खपवून घेतले जाणार नाही.

बिपीन रावत म्हणाले, पाकिस्तानी सेना सतत कुरघोड्या करत असते. यामध्ये भारतीय सीमेत घुसखोरी, दहशतवाद्यांना प्रोत्साहन आणि भारतातील राज्यांमध्ये दहशतवादी कारवायांसाठी मदत करणे याचा समावेश आहे. याविरोधात भारतीय भारतीय सेना मजबुतीने उभी आहे. २०१६ उरी दहशतवादी हल्ला आणि बालाकोट हवाई हल्लानंतर भारताच्या प्रतिक्रियेने देशाच्या राजकीय आणि सैन्याच्या इच्छाशक्तीचे प्रदर्शन केले आहे. भारतीय सेना पाकिस्तानने प्रायोजित केलेल्या दहशतवादाला आणि घुसखोरीला उत्तर देताना देशाच्या सीमेचे संरक्षण करण्यास सक्षम आहे.

कारगिल युद्धावर बोलताना रावत म्हणाले, पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही चुकीला माफ केले जाणार नाही. त्यांना याची जरुर शिक्षा मिळेल. पाकिस्तान पुन्हा कारगिल युद्ध छेडण्याची हिम्मत करणार नाही. कारण, त्यांना याचा परिणाम काय होणार माहित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details