नवी दिल्ली - महात्मा गांधी त्यांच्या बैठकीची सुरुवात सर्वधर्म प्रार्थना म्हणून करायचे. या प्रार्थनेमध्ये सर्व धर्मांमंधील तत्वे समावलेली होती. धार्मिक सहिष्णुतेवर गांधीजींची गाढ श्रद्धा होती. तसेच अनेक धर्मांबद्दल गांधींनी त्यांच्या वडिलांकडूनही एकलेलं होतं. खासकरुन मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांनी जास्त ऐकलं होतं. मद्यपान आणि मांसाहारामुळे ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांची मते थोडी वेगळी होती. ख्रिश्चन धर्मातील लोक हिंदू देव देवतांना नावे ठेवत असल्याचही त्यांनी ऐकलं होतं.
मात्र, गांधीजी जेव्हा इंग्लडला गेले तेथे त्यांना असा एक ब्रिटीश व्यक्ती भेटला. जो शाकाहारी होता आणि मद्यपानही करत नव्हता. या ब्रिटीश व्यक्तीने त्यांना बायबल वाचायला दिलं. त्यातील 'न्यु टेस्टामेंट' हा धडा वाचून गांधी अतिशय प्रभावित झाले. कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर तुम्ही दुसराही गाल पुढं करायला हवा, हे त्यांनी सर्वप्रथम त्यातच वाचलं. वाईट विचारांना चांगल्या विचारानेच जिकंता येतं, असे गांधीजी मानत असत. लहानपणापासूनच सत्यासंबधीचे विचार माझ्या मनात येत तर नाही ना? असेही गांधींना कधीकधी वाटे.
प्रत्येक धर्माला समानतेच्या भावनेनं पाहिलं पाहिजे, असं गांधीजी मानायचे. त्यामुळेच तर लहानपणापासून धार्मिक एकात्मता त्यांच्या मनामध्ये रुजली होती. मनुस्मृती वाचल्यानंतर गांधीजी नास्तिकतेच्या आणखी जवळ गेले. कारण मनुस्मृतीमध्ये मांसाहाराला प्रोत्साहन दिले होते. वेगवेगळे धर्म ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आल की, सगळे धर्म जगाच्या नियमांवर आधारलेले आहेत, आणि हे नियम शेवटी सत्याशी एकरुप होतात. लहानपणापासूनच सत्याची साथ त्यांच्या जीवनाचं अभिन्न अंग बनले होते. पुढे तेच त्यांच्या जीवनाचा आधार बनला. त्यांच्या प्रत्येक कामामधून सत्याची बाजू दिसून येते.
भारताच्या फाळणीसाठी गांधींना दोषी धरलं जात, हे फारच चुकीच आहे. वीर सावरकर आणि इक्बाल सारख्या व्यक्तींनी द्विराष्ट्र सिद्धांताला खतपाणी घातल होतं. मात्र, तरीही धर्मांध आणि कट्टर विचाराचे लोक गांधींना फाळणीसाठी जबाबदार धरतात. तस पाहिलं तर भारताच्या फाळणीचा निर्णय मांऊटबॅटन, नेहरु, पटेल आणि जिनांनी घेतला होता. फाळणीच्या निर्णयापासून गांधीना वेगळं ठेवण्यात आल होत. फाळणी करण्याचा निर्णय झाल्यानंतरच त्यांना सांगण्यात आल. जर गांधीचा फाळणीला पाठिंबा असता तर ते सत्तांतराच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले नसते. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधी पश्चिम बंगालमधील नौखाली भागामध्ये धार्मिक दंगली रोखण्यासाठी उपोषणाला करत होते.
लोक धार्मिक सहिष्णूता, अहिंसा आणि शांतता राखण्यासाठी केलेले उपदेश पाळत नाहीत, त्यामुळे गांधीनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. नैतिकता पाळण्याशिवाय गांधीपुढे पर्याय नव्हता. नैतिकतेच्या विचारांमुळेच ते लोकांना हिंसेपासून परावृत्त करत होते.
फाळणीच्या वेळी धार्मिक दंगली उसळल्यानंतर गांधीजींनी अल्पसंख्यांकांच्या रक्षणासाठी उपोषणाला बसले. भारतामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आणि पाकिस्तानातील शीखांच्या समर्थनार्थ गांधींनी उपोषण सुरू केले होते. त्यामुळे कट्टर हिंदुत्त्ववादी लोक गांधीजींवर नाराज होते. या कट्टर लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या बद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान सरकारला साडेपाच कोटी द्यावेत, असे गांधी म्हणतायेत अशी अफवा पसरवली. मात्र, खरंतर ही रक्कम भारताला मिळणार होती. गांधी असे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी फाळणीच्या वेळी हिंदू मुस्लिमांच्या एकतेसाठी काम केलं. गांधीच्या एकतेच्या या विचारांना पाकिस्तानमध्येही मान्यता मिळत होती.