बंगळुरू -विज्ञान क्षेत्रामध्ये महत्त्वाचे व्यासपीठ असणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसचे १०७ वे अधिवेशन शुक्रवारी बंगळुरू येथे सुरू झाले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या रायगड येथील एका विद्यार्थिनीला इन्फोसिस फाउंडेशन आयएससीए ट्रॅव्हल अवॉर्ड मिळाला आहे. झैमा सामन असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
१०७ व्या 'इंडियन सायन्स काँग्रेस' अधिवेशन : महाराष्ट्रातील विद्यार्थिनीला मिळाला इन्फोसिस फाउंडेशन आयएससीए ट्रॅव्हल अवॉर्ड - झैमा सामन
महाराष्ट्र राज्यातल्या रायगड येथील एका विद्यार्थिनीला इन्फोसिस फाउंडेशन आयएससीए ट्रॅव्हल अवॉर्ड मिळाला आहे. झैमा सामन असे त्या विद्यार्थिनेचे नाव आहे.
झैमा सामन हीने इंडियन सायन्स काँग्रेसच्या १०७ व्या अधिवेशनामध्ये शोध निबंधाचे सादरीकरण केले. गेल्या 2 वर्षांमध्ये विज्ञानाने किती प्रगती केली आणि रोजच्या जीवनात विज्ञान किती महत्त्वाचा भाग आहे, याविषयी तिने सादरीकरण केले. महिला पुरुषांइतकेच चांगले काम करू शकतात, असे झैमा ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाली. तसेच प्रोत्साहन दिल्याबद्दल झैमाने शिक्षक आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.
इंडियन सायन्स काँग्रेसचे १०७ वे अधिवेशनाला जगभरातील वैज्ञानिक आणि महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली. ५ हजार विविध क्षेत्रातील व्यक्ती या अधिवेशनात सहभाग झाल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. शुक्रवारी अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. नव्या वर्षातील पहिला कार्यक्रम विज्ञानाशी जोडला गेल्यामुळे मोदींनी समाधान व्यक्त केले.