नवी दिल्ली -पावसाळी अधिवेशन सुरू असून महाराष्ट्रातील खासदार अशोक नेते यांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर,भंडारा, नागपूर,गोदिंया आणि गडचिरोली जिल्ह्यातील समस्या संसदेत मांडल्या. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मध्य प्रदेशातील संजय प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गोशीपूर प्रकल्पाचे सर्व गेट 4 मीटरपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे 1994 आणि 2005 च्या पूरापेक्षाही जास्त महापूर पाणी सोडल्यामुळे आला आहे. हा महापूर निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहे, असे ते संसदेत म्हणाले.
'पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना केंद्र सरकारने मदत करावी'
महाराष्ट्रातील खासदार अशोक नेते यांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर,भंडारा, नागपूर,गोदिंया आणि गडचिरोली जिल्ह्यातील समस्या संसदेत मांडल्या.
अशोक नेते
महापूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो एकर शेतीमध्ये रेती पसरली असून जमिन खरडून गेली आहे. तसेच गायी, शेळी पूराच्या पाण्यात वाहून गेली, तर घरात पाणी शिरल्याने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरातील अन्न धान्य आणि इतर साहित्यही पाण्यात वाहून गेले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने 10 हजार रुपये तत्काळ मदत द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.