महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाविकास आघाडीचा चमत्कार गोव्यातही पाहायला मिळेल - संजय राऊत - महाविकास आघाडी

महाराष्ट्रात भाजपविरोधी महाविकास आघाडीचे सरकार  स्थापन झाले, तशी आघाडी गोवा राज्यामध्येही येत्या काळात पाहायला मिळणार असल्याचे सुतोवाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत, Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Nov 29, 2019, 1:00 PM IST

मुंबई- महाराष्ट्रात भाजपविरोधी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तशी आघाडी गोवा राज्यामध्येही येत्या काळात पाहायला मिळणार असल्याचे सुतोवाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई ३ आमदारांसह शिवसेनेबरोबर युती करत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा -..तर प्रज्ञा ठाकूरला जिवंत जाळू; काँग्रेस नेत्याची धमकी!


४० सदस्यीय गोव्याच्या विधानसभेमध्ये भाजपचे बहुमत असून त्यांच्याकडे २७ आमदार आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे ३ आमदार, काँग्रेसचे ५, तर राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे.

२०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाने १७ जागा जिकंल्या होत्या. तर भाजपने फक्त १३ जागा जिंकल्या होत्या. मात्र, भाजपने काँग्रेसविरोधी पक्षांना एकत्र करत काँग्रेसविरोधी आघाडी तयार केली. यावर्षी जुलै महिन्यात काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले. फक्त घोषणांनी सरकार बदलत नाही, तर सरकारमध्ये अचानक बदल होतात. जे महाराष्ट्रात झाले ते गोव्यातही होईल, सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. आम्ही संजय राऊतांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडी गोव्यामध्येही व्हायला पाहिजे, असे गोवा फारवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -'टीएसआरटीसी' कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत, कोणत्याही अटींशिवाय पुन्हा रूजू करणार


उद्धव ठाकरेंनी काल(गुरुवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतल्यानंतर आज संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. मागील एक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा पेच सुरु होता, भाजपने राष्ट्रवादीच्या अजित पवारांना बरोबर घेत सरकारही स्थापन केले होते. मात्र बहुमताअभावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनेक चर्चेच्या फेऱ्यानंतर शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली सरकार स्थापन झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details