महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसचा मध्यप्रदेशमध्ये अपघात, ४ जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रत्येकी मृताच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

By

Published : Jun 12, 2019, 2:06 AM IST

Updated : Jun 12, 2019, 3:39 PM IST

यात्रेकरू

भोपाळ - चित्रकूट तीर्थस्थळाला जाणाऱ्या नाशिक येथील यात्रेकरूंची बस विदिशा-सागर रोडवरील डीबीसी बँकेजवळ रात्री 10 वाजेच्या सुमारास पलटल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात विदिशा जिल्ह्यातील धुरिया गावाजवळ झाला. या अपघातात ४ यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून 20 यात्रेकरू गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती देताना यात्रेकरू

रात्रीच्या वेळी बस अति वेगाने चालवत असताना ड्रायव्हरला रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने हा अपघात झाला. या अपघातात २ जणांचा बसमधेच मृत्यू झाला, तर गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे २ जणांचा मृत्यू झाला.

नाशिकहून रविवारी रात्री सर्वज्ञ यात्रा कंपनीच्या खाजगी बसने (जीजे.14 झेड.0197) 60 यात्रेकरू चित्रकूटसह उत्तर भारतात तीर्थयात्रा करायला निघाले होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रत्येकी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

Last Updated : Jun 12, 2019, 3:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details