पणजी - जनमत आपल्या विरोधात जात असून लोक मते देणार नाहीत, म्हणून भाजप आमदारांची चोरी करत आहे. यातून महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाने धडा शिकावा, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
भाजपच्या आमदार चोरण्याच्या घटनेतून 'मगो'ने धडा शिकावा - काँग्रेस
जनमत आपल्या विरोधात जात असून लोक मते देणार नाहीत, म्हणून भाजप आमदारांची चोरी करत आहे. यातून महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाने धडा शिकावा, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
आज पहाटे भाजपने मगोला खिंडार पाडत त्यांच्या दोन आमदारांना पक्षात घेतले. या पार्श्वभूमीवर बोलताना गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले, आपल्याला माहीत आहे की, चोर रात्रीच्या वेळीच किंमती सामानाची चोरी करत असतात. त्याचप्रकारे जनमत आपल्या विरोधात असल्याने मते मिळून उमेदवार जिंकून येऊ शकत नाही, म्हणून भाजप मध्यरात्री आपल्या सहकारी पक्षातील आमदार चोरत आहे. पक्षांतर बंदी कायद्यातून पळवाट शोधून अशाप्रकारे आमदार फोडले जात आहेत, ही लोकशाहीची शोकांतिका आहे.
मगो हा भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्ष असतानाच भाजपने त्यांचे दोन आमदार फोडले. यावरून मगोने धडा घेतला पाहिजे, असेही डिमेलो म्हणाले. तर काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या वाटेवर आहेत हे खरे आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, आमचे आमदार एकसंघ आहेत.