चैन्नई - तामिळनाडूतील सर्व सरकारी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मात्र, दारूच्या ऑनलाइन विक्रीवर न्यायालयाने सूट दिली आहे. लॉकडाऊन काळात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
दारूची दुकाने बंद ठेवण्याचे मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश - मद्य विक्री
तामिळनाडूतील सर्व सरकारी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मात्र, दारूच्या ऑनलाइन विक्रीवर न्यायालयाने सूट दिली आहे.
राज्यातील दारूची दुकाने गुरुवारी 45 दिवसांच्या कालावधीनंतर उघडण्यात आली होती. यात दारुची एकूण विक्री सुमारे 170 कोटी रुपये झाली होती. दारू खरेदी करताना न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. याचा परिणाम म्हणून, कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यमने न्यायालयात याचिका दाखल केली.
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये दारूची दुकाने उघडली गेली आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील लोक सीमोल्लंघन करून दारू आणण्याचा प्रयत्न करत होते. अशा घटना समोर आल्यानंतर राज्यात दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले होते. तर सरकारच्या दारूची दुकाने उघडण्याच्या निर्णयावर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.