महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शशी थरूर, अनुराधा पाटील यांच्यासह 23 जणांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

मराठी भाषेसाठी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना 'कदाचित अजूनही' या कविता संग्राहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात येणार आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

By

Published : Dec 18, 2019, 11:10 PM IST

नवी दिल्ली - प्रतिष्ठित साहित्य अकादमीने वर्ष 2019 चे २४ पैकी २३ भाषांतील पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथात्तर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा समावेश आहे.

मराठी भाषेसाठी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना 'कदाचित अजूनही' या कविता संग्राहासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हिंदीसाठी नंदकिशोर आचार्य यांच्या 'छीलते हुए अपने को' या कवितासंग्रहाला तर इंग्रजीमध्ये खासदार शशी थरूर यांच्या 'एन अॅरा ऑफ़ डार्कनेस' याला जाहीर झाला आहे. उर्दू भाषेमध्ये शाफ़े किदवई यांच्या 'सवनेह-ए-सर-सैयद- एक बाज़दीद' ला पुरस्कार देण्यात आला आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर कंबर यांच्या अध्यक्षतेखाली अकादमीच्या कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. संबंधित भाषेच्या त्रिस्तरीय निर्णायक मंडळाने विहित निवड प्रक्रियेनंतर या पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड केली. 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्ली येथे आयोजित एका विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यांना मिळालाय साहित्य आकादमी पुरस्कार...

  • इंग्रजी - शशी थरूर , एन अॅरा ऑफ़ डार्कनेस' (कथात्तर गद्य )
  • असमिया - जय श्री गोस्वामी महंत, 'चाणक्य' (कादंबरी)
  • बाड्ला - चिन्मय गुहा,'घुमेर दरजा थेले' (निबंध)
  • उर्दू - शाफ़े किदवई, 'सवनेह-ए-सर-सैयद- एक बाज़दीद', (आत्मचरित्र)
  • बोडो - फुकन चन्द्र, 'आखाइ आथुमनिफ्राय' ( कवितासंग्रह)
  • डोगरी - ओम शर्मा, 'बंदरालता दर्पण' (निबंध)
  • गुजराती- रतिलाल बोरीसागर, 'मोजमा रे वुं रे' (निबंध)
  • कन्नड़ - विजया, 'कुड़ी एसारू' (आत्मकथा)
  • कश्मीरी- अब्दुल अहद हाज़िनी,'अख़ याद अख़ कयामत' (कथासंग्रह)
  • कोंकणी - निलबा खांडेकर, 'ध वर्डस्' ( कवितासंग्रह)
  • मैथिली - कुमार मनीष,'जिनगीक ओरिआओन करैत' ( कवितासंग्रह)
  • मलयालम- मधुसूदन नायर, 'अचन पिरन्ना वीदु' ( कवितासंग्रह)
  • मणिपुरी - बेरिल,'ई अमादी अदुनगीगी ईठत' (कादंबरी)
  • मराठी- अनुराधा पाटील, 'कदाचित अजूनही ( कवितासंग्रह)
  • ओड़िया - तरूण कांति, 'भास्वती' (कथासंग्रह)
  • पंजाबी - किरपाल कज़ाक,'अंतहीन' (कथासंग्रह)
  • राजस्थानी- रामस्वरूप किसान, 'बारीक बात' (कथासंग्रह)
  • संस्कृत - पेन्ना मधुसूदन, 'प्रज्ञाचाक्षुषम्' ( कवितासंग्रह)
  • संताली - काली चरण,'सिसिरजली' (कथासंग्रह)
  • सिंधी - ईश्वर मूरजाणी, 'जीजल' (कथासंग्रह)
  • तमिल- धर्मन, 'सूल' (कादंबरी)
  • तेलुगु - बंदि नारायणा स्वामी,'सेप्ताभूमि (कादंबरी)
  • हिंदी- नंदकिशोर आचार्य,'छीलते हुए अपने को' ( कवितासंग्रह)


नेपाळी भाषेसाठी अद्याप पुरस्काराची घोषणा करण्यात आली नाही आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details