भोपाळ- कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. या कठीण काळात सर्वाधिक त्रास हातमजुरी करणाऱ्या कामगारांना होत आहे. लॉकडाऊनमुळे या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीतही अनेक लोक या लोकांना मदत करत आहेत.
मध्यप्रदेश : 'वर्दी'तील दर्दी.. पोलिसांकडून फुटपाथवर राहणाऱ्यांना अन्नाचे वितरण
भोपाळच्या टीटी नगर ठाण्याचे पोलीस कर्मचारी स्वतः जेवण बनवून फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना वाटत आहेत. देवास पोलीसही रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या उपाशीपोटी लोकांना जेवण देत आहे.
या कठीण प्रसंगात सर्वात महत्वाची भूमिका पोलीस बजावत आहेत. लॉकडाऊनच्या या काळात पोलिसांची अनेक रुपे लोकांसमोर आली. कधी जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करतांना आपण यांना बघितले, तर कधी लोकांना लॉकडाऊनचे महत्व समजावून सांगताना, तर कधी उपाशीपोटी असणाऱ्यांना जेवण पुरवताना दिसले. तर, कधी पायी चालत जाणाऱ्यांना स्वतःच्या वाहनातून त्यांच्या घरी सोडताना दिसले.
भोपाळच्या टीटी नगर ठाण्याचे पोलीस कर्मचारी स्वतः जेवण बनवून फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना वाटत आहेत. देवास पोलीसही रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या उपाशीपोटी लोकांना जेवण देत आहे. हेच चित्र राज्यातील जबलपूर, सागर, ग्वाल्हेर या ठिकाणीही दिसत आहे. आपली जबाबदारी पार पाडण्यासह पोलीस गरजूंना मदत करत आहे.