महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुस्लिमांना त्यांचा हिस्सा १९४७ लाच दिलाय - भाजप - ovaisi

मोदींनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर एनडीएच्या सर्व खासदारांची एक बैठक आयोजीत केली होती. त्यावेळी अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करणे हे भाजपचे महत्वाचे उद्दीष्ट्य असल्याचे सांगितले होते.

माधव भंडारी

By

Published : Jun 2, 2019, 12:42 PM IST

Updated : Jun 2, 2019, 2:01 PM IST

मुंबई - असदुद्दीन ओवेसी यांनी विचार करून बोलावे. देशात मुस्लिमांना कोणीही भाडेकरू असल्याचे म्हटलेले नाही. तरीही मुस्लिमांना ते देशातील हिस्सेदार आहेत असे वाटत असेल तर, त्यांचा हिस्सा त्यांना १९४७ लाच देण्यात आला आहे. त्यामुळे तो विषय तिथेच संपला, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे.

माधव भंडारी

देशात ३०० जागांवर विजय मिळवला म्हणून भाजप मुस्लिमांना घाबरवू शकत नाही. आम्ही देशात भाडेकरू नसून समान हिस्सेदार आहोत, असे वक्तव्य एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते मुख्तार अब्बसा नक्वी यांनीही टीका केली होती. ओवेसी हे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी, अशी वक्तव्ये करत असल्याचे ते म्हणाले. आज माधव भंडारी यांनी मात्र, मुस्लिमांना त्यांचा वाटा १९४७ लाच देण्यात आला असून तो विषय तिथेच संपला असल्याचे म्हटले आहे.

मोदींनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर एनडीएच्या सर्व खासदारांची एक बैठक आयोजीत केली होती. त्यावेळी अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करणे हे भाजपचे महत्वाचे उद्दीष्ट्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता माधव भंडारी यांचे वक्तव्य मोदींच्या भूमिकेशी विसंगती दाखवत असल्याचे दिसते. माधव भंडारी यांच्या वक्तव्यावरून वादंग उठण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jun 2, 2019, 2:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details