महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संपूर्ण भारतात दिसले खंडग्रास चंद्रग्रहण

भारतात बुधवारी काही तासांसाठी खंडग्रास चंद्रगहण पाहायला मिळाले.  हे चंद्रग्रहण बुधवारी रात्री १.३१ वाजता सुरू झाले आणि ४.३० वाजताच्या सुमारास संपले.

मुंबईतही हे चंद्रग्रहण पाहायला मिळाले

By

Published : Jul 17, 2019, 6:17 AM IST

Updated : Jul 17, 2019, 7:23 AM IST

मुंबई-भारतात बुधवारी काही तासांसाठी खंडग्रास चंद्रगहण पाहायला मिळाले. हे चंद्रग्रहण बुधवारी रात्री १.३१ वाजता सुरू झाले आणि पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास संपले. या ग्रहणाचा एकूण कालावधी २ तास ५८ मिनिटांच्या जवळपास होता. तब्बल १४९ वर्षांनंतर हे चंद्रग्रहण दिसले आहे.

या पूर्वी २६ मे २०२१ रोजी असे चंद्रग्रहण दिसले होते. भारताच्या सर्व भागात हे चंद्रग्रहण पाहायला मिळाले. हे चंद्रग्रहण भारतासहीत अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया तसेच आशिया खंडातही पाहायला मिळाले. मुंबईतही हे चंद्रग्रहण पाहायला मिळाले.

जेव्हा सूर्य व चंद्राच्यामध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. जगातील काही भागात चंद्र ग्रहणाचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले आहे. चंद्र ग्रहणाच्यावेळी चंद्र पूर्णपणे गडद झाला होता. चंद्र ग्रहणाच्या प्रत्येक तपशीलावर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती. भारतात पुढील चंद्रग्रहण हे २६ मे २०२१ साली होईल. तेव्हा मात्र, पूर्ण चंद्र ग्रहण होईल.

Last Updated : Jul 17, 2019, 7:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details