लोकसभा २०१९: मोरादाबादेतून इम्रान प्रजापगर्ही तर, फतेहपूर सिकरीतून राज बब्बरना उमेदवारी
रेणुका चौधरी तेलंगणातील खम्माम येथून लढणार आहेत. प्रीता हरीत या आग्र्यातून लढतील. या यादीत छत्तीसगडमधून ४, जम्मू-काश्मीरमधून २, पुदुच्चेरीतून १, महाराष्ट्रातून ५, ओडिशातून २, तेलंगणातून ८, त्रिपुरातून २, उत्तर प्रदेशातून ६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
राज बब्बर, रेणुका चौधरी
नवी दिल्ली - काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेसने एक मोठा बदल केला आहे. मागील वेळेस उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथून निवडणूक लढवणाऱ्या राज बब्बर फतेहपूर सिकरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, मोरादाबाद येथून इम्रान प्रजापगर्ही निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय, रेणुका चौधरी तेलंगणातील खम्माम येथून लढणार आहेत. प्रीता हरीत या आग्र्यातून लढतील. या यादीत छत्तीसगडमधून ४, जम्मू-काश्मीरमधून २, पुदुच्चेरीतून १, महाराष्ट्रातून ५, ओडिशातून २, तेलंगणातून ८, त्रिपुरातून २, उत्तर प्रदेशातून ६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
काँग्रेसने ओडिशा विधानसभा निवडणुकांसाठीही ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जयदेव जेना हे अदनानपूर तर, बिप्लब जेना हे अंगूल येथून लढतील. नसीमुद्दीन सिद्दीकी बिजनोर आणि प्रवीण अरोन हे बरेली येथून लढतील.
Last Updated : Mar 23, 2019, 3:50 AM IST