ओडिशा- मुंबई-भुवनेश्वर दरम्यान धावणारी लोकमान्य टिळक एक्सप्रेस ओडिशामधील कटकजवळील निरगुंडी येथे रुळावरून घसरली आहे. या अपघातात ३० जण किरकोळ तर ४ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मालवाहू रेल्वेच्या गार्ड व्हॅनला धडकल्यामुळे लोकमान्य एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले.
लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे ८ डबे ओडिशात घसरले, ३० जखमी, ४ गंभीर - मुंबई ते भुवनेश्वर रेल्वे
मुंबई ते भुवनेश्वर दरम्यान धावणारी लोकमान्य टिळक एक्सप्रेस ओडिशामधील कटकजवळील निरगुडी येथे रुळावरून घसरली आहे.
संग्रहित छायाचित्र
दाट धुक्यामुळे सकाळी ७ च्या दरम्यान निरगुंडी आणि सालगाव दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींचा आकडा रल्वे प्रशासनाने प्राथमिक तपासणीनंतर दिला आहे. नक्की किती जण जखमी झाले आहेत, याची माहिती अजून मिळाली नाही.
रेल्वे विभागाची मदत व्हॅन घटनास्थळावर पोहोचली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना एससीबी मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे.
Last Updated : Jan 16, 2020, 10:09 AM IST