महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये आरजेडीकडून लोकसभा निवडणूक 'प्रतिबद्धता पत्र' जाहीर

जाहीरनामा सादर करताना तेजस्वी यांनी राज्यामधील स्थलांतर थांबवण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलणार असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी काँग्रेसच्या किमान उत्पन्न योजनेलाही पाठिंबा दिला.

आरजेडी जाहीरनामा

By

Published : Apr 8, 2019, 11:29 AM IST

पाटणा - आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी पक्षाचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा सादर केला. याला 'प्रतिबद्धता पत्र' असे नाव देण्यात आले आहे. आरजेडीने यात दलितांना आणि मागास समाजाला त्यांच्या जातीच्या लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

जाहीरनामा सादर करताना तेजस्वी यांनी राज्यामधील स्थलांतर थांबवण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलणार असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी काँग्रेसच्या किमान उत्पन्न योजनेलाही पाठिंबा दिला. काँग्रेसने मागील आठवड्यात जाहीरनामा सादर केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details