महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदीजी युद्ध संपले; ..आता माझे वडीलही तुम्हाला वाचविण्यास येणार नाहीत - राहुल गांधी

पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधींवर प्रषोभक टीका केल्यानंतर राहुल गांधी संतापले आहेत. मात्र, गांधीगीरीचा मार्ग अवलंबून त्यांनी ट्विट केले. त्यामध्ये आलिंगन देत त्यांनी मोदींना त्यांच्या चुकीबद्दल इशारा दिला आहे.

By

Published : May 5, 2019, 12:50 PM IST

Updated : May 5, 2019, 10:11 PM IST

राहुल गांधी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील रॅलीमध्ये राहुल गांधींवर 'तुमचे वडील माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हणून (शिक्का घेऊन) या जगातून गेले' अशी अत्यंत टोकाची टीका केली होती. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांना ट्विटमधून प्रत्युत्तर दिले आहे. मोदीजी हे युद्ध आता संपले. तुमचे कर्म तुमची वाट पाहात आहेत. तुम्ही आपल्या मनातील ज्या ही गोष्टी माझ्या वडिलांवर थोपवत आहात, हे अत्यंत निंदनीय असून त्या पासून आता माझे वडिलही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये शेवटी मोदी यांना आलिंगन दिले आहे.

नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर अशा प्रकारे टीका केल्यानंतर प्रियांका गांधी आणि ज्येष्ठ पक्ष नेते पी. चिदंबरम यांनी मोदींची तीव्र निर्भत्सना केली होती. राफेल प्रकरणावरून काँग्रेसकडून मोदींना वारंवार लक्ष्य केले जात आहे. आपली प्रतिमा खराब करणे हे राहुल गांधींचे एकमेव उद्दिष्ट आहे, असे मोदींनी म्हटले होते. 'तुमच्या वडिलांना त्यांच्या खुशामती लोकांनी क्लीन चिट दिली होती. मात्र, तुमच्या वडिलांना क्रमांक एकचे भ्रष्टाचारी म्हणून मृत्यू आला,' असे मोदी म्हणाले होते. यानंतर पी. चिदंबरम यांनी 'मोदींनी शिष्टसंमत आचार आणि सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ते १९९१ मध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीची (राजीव गांधी) बदनामी करत आहेत,' असे ट्विट केले आहे.

Last Updated : May 5, 2019, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details