नवी दिल्ली - बारा तासांच्या चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदारांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे लोकसभेत चर्चेदरम्यान संबंधित खासदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांना विस्तृत उत्तरे दिल्याबद्दल अमित शाह यांचे कौतुक देखील केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे 1 तास तपशीलवार भाषण केले. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत हे विधेयक देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध नसल्याचे शाह यांनी ठासून सांगितले.