नवी दिल्ली - बारा तासांच्या चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे 1 तास तपशीलवार भाषण केले. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत हे विधेयक देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध नसल्याचे शाह यांनी ठासून सांगितले.
लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर, विधेयकाच्या बाजूने 311 मतं
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पटलावर मांडले जावे की मांडले जाऊ नये यावर मतदान घेण्यात आले. यात 293 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पटलावर मांडले जावे की मांडले जाऊ नये यावर मतदान घेण्यात आले. यात 293 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकावर तब्बल 12 तास चर्चा झाली.
सर्व सुधारणांवर आवाजी मतदान घेण्यात आल्यानंतर हे विधेयक संमत करण्यात यावे, असा प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. त्यावर प्रथम आवाजी मतदान घेण्यात आले व त्यानंतर सदस्यांच्या मागणीनुसार मतविभाजन घेण्यात आले. 311 विरुद्ध 80 मतांनी हे दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले.