नवी दिल्ली - देशातील लॉकडाऊनसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सुमारे चार ते पाच तास चाललेल्या या बैठकीनंतर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत लॉकडाऊन वाढल्याचे संकेत दिले आहेत.
केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले, की लॉकडाऊन वाढवण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. देशात लवकर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे आज भारतातील परिस्थिती कित्येक प्रगत देशांहून पुढे आहे. जर आता हे हटवण्यात आले, तर आपण आतापर्यंत जे काही कमावले आहे, ते गमावू. त्यामुळे हा लॉकडाऊन वाढवणेच गरजेचे आहे.