नवी दिल्ली -राजधानी दिल्लीतील पोलिसांनी शहरातील विविध भागात काम करणाऱ्या गर्भवती असलेल्या 17 मजूर महिलांना स्वतःच्या वाहनांमधून (पीसीआर व्हॅन) शहरातील विविध रुग्णालयात दाखल केले. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी ही स्तुत्य कामगिरी केली आहे. पोलीस उपायुक्त शरत कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
लॉकडाऊन : दिल्ली पोलिसांनी 17 गर्भवती महिलांना शहरातील रुग्णालयात केले दाखल
दिल्ली पोलिसांनी शहरातील विविध भागात काम करणाऱ्या गर्भवती असलेल्या 17 मजूर महिलांना स्वतःच्या वाहनांमधून शहरातील विविध रुग्णालयात दाखल केले. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी ही स्तुत्य कामगिरी केली आहे.
दिल्ली पोलीस
हेही वाचा...COVID-19 : इंग्लंडच्या पंतप्रधानांना रुग्णालयात हलवले..
पश्चिम दिल्लीतील तीन महिला, बाह्य-उत्तरे दिल्लीच्या तीन महिला, द्वारकाकडून तीन महिला, पूर्व दिल्लीतील दोन महिला, शहराच्या बाहेरील भागातून दोन महिला, ईशान्य, वायव्य आणि दक्षिण दिल्लीहून एक महिला यांना दिल्ला पोलिसांनी सहिसलामत रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली.