बेळगाव -कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील भागातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यामध्ये मुले नाचताना दिसत आहेत.
पुराच्या पाण्यात मुलांचा झिंगाट डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - belgaum
कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील भागातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पूरपरिस्थितीचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये नागरिकांना होणाऱ्या अचडणी आणि बचावकार्य सुरु असल्याचे पाहायला मिळते तर कर्नाटकमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुले मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहेत.
सध्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. कोल्हापूर, सांगलीपाठोपाठ पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यामुळे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.