नवी दिल्ली -केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच पुत्र चिराग पासवान यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. बिहार निवडणुकीच्या तोंडावर रामविलास पासवान यांचे निधन झाले. त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाची (एलजेपी) सर्व जबाबदारी चिराग पासवानच्या शिरावर येऊन पडली आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली एलजेपी पक्षाने रालोआबरोबरची आघाडी तोडली असून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी ही वडिलांची इच्छा असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले.
'वडील मला कायम म्हणायचे, नेत्याकडे 'नियत' आणि 'निती' पाहिजे. तुझ्याकडे बिहारचा विकास करण्याची इच्छा आहे, तसेच विकासासाठीचे धोरण आहे, त्यामुळे तू एकट्याने निवडणूक लढवावी, चिरागच्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा आहे,' अशी आठवण चिराग पासवान यांनी सांगितली. यावेळी त्यांनी 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या योजनेचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबतच्या बिघडलेल्या संबंधावर विचारले असता, नितीश कुमार पित्रुतुल्य असल्याचे चिराग म्हणाले.
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट या योजनेमध्ये बिहारमधील सर्व अडचणींचा उल्लेख केला आहे. बिहारच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राजस्थानला का जावे लागते? बिहारी नागरिक रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात का जातात ? मुंबई, दिल्लीचा कोणी विद्यार्थी बिहारला शिक्षणासाठी आला असेल, असे मला कधी दिसले नाही. राज्यातील नेते उपचारासाठी दुसऱ्या राज्यात का जातात? उद्योगधंदे, पायाभूत सुविधा राज्यात का नाहीत ? असे प्रश्न चिराग पासवान यांनी केले.
मला जातीचे राजकारण करायचे नाही
मी एनडीएमध्ये राहीलो असतो तर, जेवढ्या जागा लढलो असतो, त्या सर्व जिंकलो असतो. मात्र, मला जातीचे राजकारण करायचे नाही. मला बिहारचा विकास करायचा आहे. राज्यात उद्योगधंदे आणायचे आहेत. आरोग्य सुविधा सुधारायच्या आहेत. जातीच्या राजकारणात मला पडायचे नाही, असे चिराग यांनी म्हटले.
पंतप्रधानांचा फोटो माझ्या हृदयात