महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून आले तर आपली हत्या करतील; शरद यादवांचे धक्कादायक वक्तव्य - Lok sabha poll

लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विविध पक्षांच्या प्रचार सभांना उधाण आले आहे. दरम्यान मोठ-मोठाले पक्ष नेते वाटेल ते विधान करत आहेत. त्यामध्ये आता शरद यादवांचे वक्तव्य समोर आले आहे.

शरद यादव (संग्रहित छायाचित्र)

By

Published : Apr 15, 2019, 10:26 PM IST

पाटणा -पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकले तर ते आपली हत्या घडवून आणतील, असे धक्कादायक विधान लोकतांत्रिक जनता दलाचे (लोजद) नेते शरद यादव यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आयोजित एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विविध पक्षांच्या प्रचार सभांना उधाण आले आहे. दरम्यान मोठ-मोठाले पक्ष नेते वाटेल ते विधान करत आहेत. त्यामध्ये आता शरद यादवांचे वक्तव्य समोर आले आहे. बिहारच्या सहरसा येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी चक्क मोदी आपल्याला मारून टाकतील, असा आरोप केला. जर मोदी पुन्हा जिंकले आणि त्यांनी सराकर स्थापन केली तर ते आपल्याला गोळी मारून हत्या करतील किंवा आपल्याता तुरुंगात डांबतील, असे त्यांनी म्हटले.

शरद यादव यांच्या पक्षाने बिहारमध्ये काँग्रेस, आणि लालू यादवांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी केली आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीए पक्षांविरोधात मोठे आव्हान उभे झाले आहे. अशातच शरद यादव यांनी हे वक्तव्य राजकारण चमकवण्यासाठीच उद्गारले, अशी चर्चा सुरू आहे.

यापूर्वीही यादवांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर अभद्र वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी वसुंधरा यांना आराम द्या त्या खुप लठ्ठ झाल्या आहेत, असे म्हटले होते. या वक्तव्यानंतर शरद यादवांवर मोठी टीका झाली होती. मात्र, यावेळी त्यांनी चक्क मोदींनाच निशाण्यावर घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details