भोपाळ- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 4 हजाराहून अधिक झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाच्या लढ्यासाठी 6 वर्षीय चिमुकलीची अकराशे रुपयांची मदत - Corona virus
मध्यप्रदेशच्या अलीराजपूर येथील एका 6 वर्षाच्या चिमुकलीने पंतप्रधान सहाय्यता निधीत 1100 रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली आहे.
कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. तर कोरोनाशी लढण्यासाठी गुगलने मदतीचा हात दिला आहे. तर मध्यप्रदेशच्या अलीराजपूर येथील एका 6 वर्षाच्या चिमुकलीने पंतप्रधान सहाय्यता निधीत 1100 रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली आहे.
आन्या जैन, असे या 6 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. आन्या युकेजी वर्गात शिकत आहे. तिने तिच्या जम झालेल्या गल्ल्यातील पैसे पंतप्रधान सहाय्यता निधीसासाठी दिले आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क वापर, साबण आणि सॅनिटायझरचा वापर करा, साफसफाई करा यासह सोशल डिस्टंस ठेवा, असे आवाहन या चिमुकलीने केले आहे. छोट्या आन्याच्या या प्रयत्नाचे जिल्हाधिकारी श्रीमती सुरभी गुप्ता, पोलीस अधीक्षक विपुल श्रीवास्तव, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. मालवीय यांनी कौतुक केले आहे.