राम मंदिर प्रकरणातील प्रतिवादींनी एकत्र साजरी केली होळी, देशाला दिला सहिष्णुतेचा संदेश
जे लोक धर्माचा वापर मतपेढी मजबूत करण्यासाठी करतात, त्यांची डाळ आता शिजणार नाही.
अयोध्या - राम मंदिर प्रकरणात प्रतिवादी असणाऱ्या महंत धर्मदास आणि इकबाल अन्सारी यांनी एकत्र होळी साजरी केली. गैरसमज दूर व्हावेत आणि यातून चांगले परिणाम समोर यावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या कृतीतून सहिष्णुतेचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
इकबाल अन्सारी म्हणाले, की गैरसमज दूर व्हावेत आणि यातून चांगले परिणाम बाहेर यावेत. जे लोक धर्माचा वापर मतपेढी मजबूत करण्यासाठी करतात, त्यांची डाळ आता शिजणार नाही. आम्हाला जगाला हा संदेश द्यायचा आहे, की धर्म, जात, मंदिर आणि मशिदीच्या नावावर राजकारण चालणार नाही. ते पुढे म्हणाले, की बंधुभाव जपण्यासाठी आम्ही आमच्या भावासोबत होळी खेळलो. जसे दोन रंग एकमेकात मिसळतात तसे आम्ही एकमेकात मिसळलो आहोत.