महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 11, 2019, 11:22 PM IST

ETV Bharat / bharat

लेह-कारगिलसह राज्यातील जिल्ह्याची स्थिती सामान्य, डीजीपी दिलबाग सिंह यांची माहिती

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवण्यात आले आहे.

डीजीपी दिलबाग सिंह

श्रीनगर - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी तेथील परिस्थितीची माहिती दिली आहे. लेह आणि कारगिलसह राज्यातील जिल्ह्याची स्थिती सामान्य असून सर्व शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये सुरू करण्यात आल्याची माहिती डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली.

हेही वाचा -मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती विजया के. ताहिलरमाणी यांचा राजीनामा

नागरिक परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला त्यांच्याकडून पाठिंबा मिळत आहे. सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार, असे दिलबाग सिंह पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

लेह-कारगिलसह राज्यातील जिल्ह्याची स्थिती सामान्य, डीजीपी दिलबाग सिंह यांची माहिती

हेही वाचा -दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या स्मारकात पार पडला चक्क विवाह सोहळा

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख दहशतवादी ठार करण्यात आला आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आसिफचा दहशतवादी कारावायांमध्ये सहभाग होता तर तो नागरिकांना धमकावत होता, असे सिंह यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details