नवी दिल्ली -जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने मेहबूबा मुफ्तींना ताब्यात घेतले. केंद्र सरकारच्या बेकायदेशीर कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे मेहबूबा मुफ्ती,फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले, असा आरोप मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने केला आहे. तसेच नजरबंदीत ठेवल्यामुळे आपल्या आईशी संवाद साधण्याकरीता पोळीमध्ये लपवून चिठ्ठी पाठवावी लागत होती, असे इल्तिजाने सांगितले.
पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत असल्याने त्यांची मुलगी इल्तिजा ही त्यांचे ट्विटर खाते चालवत आहे. मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या भडकाऊ वक्तव्यामुळे ताब्यात घेण्यात आले नाही. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरवर केलेल्या बेकायदेशीर कारवाईवर प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना नजरबंदीत ठेवण्यात आले, असे इल्तिजा म्हणाली.
मी माझ्या आईवर प्रेम करते. मला त्याची आठवण येत होती. तेव्हा मला माझ्या आजीने पोळीमध्ये चीठ्ठी लपवून पाठवण्याची कल्पाना सुचवली. अखेर सहा महिन्यानंतर त्यांचावरील नजरबंदी हटवण्यात येणार होती. मात्र, लगेच सरकारने त्यांच्यावर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) लावण्यात आला, असेही इल्तिजा म्हणाली.