चेन्नई - भारत आणि चीनमधील दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेच्या निमित्ताने, चीनचे अध्यक्ष दोन दिवस तामिळनाडू मध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात युद्धपातळीवर स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. याची दखल घेत, राज्यात स्वच्छता रहावी यासाठी मोठ्या नेत्यांनी वरचेवर तामिळनाडूला भेट देणे गरजेचे आहे, असे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवले.
अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी, न्यायाधीश एस. वैद्यनाथ आणि सी. सर्वणन, यांच्या सुट्टीतील खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. "आता ममल्लापूरम अगदी स्वच्छ झाले आहे. जेव्हा कोणी मोठे नेते येतात तेव्हाच सरकार असे काम करते. त्यामुळे जर तामिळनाडू हे स्वच्छ ठेवायचे असेल, तर अशा मोठ्या नेत्यांनी तामिळनाडूला वारंवार भेट द्यायला हवी." असे निरीक्षण या खंडपीठाने नोंदवले.
शिखर परिषदेच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज (शुक्रवार) ममल्लापूरममध्ये भेटणार आहेत. त्यानिमित्ताने ममल्लापूरमचे सुशोभिकरण करण्यात आले आहे, त्यासोबतच शहरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ममल्लापूरम हे बंदर असल्यामुळे किनाऱ्यालगत समुद्रामध्ये नौदलाने लढाऊ जहाज तैनात केले आहेत.
...तर मोठ्या नेत्यांनी राज्याला वारंवार भेट द्यायला हवी, मद्रास हायकोर्टाचे मिश्किल निरीक्षण... - Mamallapuram
"आता ममल्लापूरम अगदी स्वच्छ झाले आहे. जेव्हा कोणी मोठे नेते येतात तेव्हाच सरकार असे काम करते. त्यामुळे जर तामिळनाडू हे स्वच्छ ठेवायचे असेल, तर अशा मोठ्या नेत्यांनी तामिळनाडूला वारंवार भेट द्यायला हवी." असे निरीक्षण या खंडपीठाने नोंदवले.
Madras High Court