नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या चिंताजनक आहे. गेल्या २४ तासात देशभरात तब्बल ७८ हजार ७६१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. एका दिवसात आढळलेले हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण असून ९४८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
शनिवारी आढळून आलेल्या नवीन ७८ हजाराहून अधिक रुग्णांमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ३५ लाखांवर (३५,४२,७३४) गेली आहे. तर मृतांचा एकूण आकडा ६३ हजार ४९८ वर पोहोचला आहे. यामध्ये ७ लाख ६५ हजार ३०२ येवढी सक्रिय रुग्णसंख्या असून २७ लाख १३ हजार ९३४ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.