महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कडक सुरक्षाव्यवस्थेत कमलेश तिवारींवर अंत्यसंस्कार - कमलेश तिवारी हत्याकांड

शनिवारी सकाळी तिवारी कुटुंबीय त्यांच्या मागण्यांवर अडून होते. या मागण्या मान्य होईपर्यंत तिवारी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास त्यांनी नकार दिला होता.

कडक सुरक्षाव्यवस्थेत कमलेश तिवारींवर अंत्यसंस्कार

By

Published : Oct 20, 2019, 1:42 PM IST

सीतापूर -अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी याच्यावर कडक सुरक्षा व्यवस्थेत अंत्यसंस्कार झाले. प्रशासनाने कुटुंबीयांच्या मागण्या मान्य केल्यानंतरच तिवारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कडक सुरक्षाव्यवस्थेत कमलेश तिवारींवर अंत्यसंस्कार

कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास दिला होता नकार

शनिवारी सकाळी तिवारी कुटुंबीय त्यांच्या मागण्यांवर अडून होते. या मागण्या मान्य होईपर्यंत तिवारी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास त्यांनी नकार दिला होता. कुटुंबीय आणि समर्थकांची नाराजी पाहून आयुक्त आणि पोलीस महानिरीक्षक महमूदाबाद येथे पोहोचले आणि त्यांनी पीडित कुटुंबीय आणि पक्षाच्या नेत्यांशी बातचित केली.

तिवारी कुटुंबीयांच्या मागण्या लिखित स्वरूपात मांडल्या

प्रशासनाशी झालेल्या चर्चेदरम्यान तिवारी यांच्या कुटुंबीयांच्या मागण्या लिखित स्वरूपात तयार करून त्या मांडण्यात आल्या. यामध्ये कुटुंबातील एक सदस्याला नोकरी, निवासस्थान, मुख्यमंत्र्यांशी कुटुंबीयांची भेट, एनआयए किंवा एटीएसकडून या घटनेची चौकशी, कुटुंबीयांची सुरक्षा आदी मागण्या मांडण्यात आल्या. शुक्रवारी लखनऊमध्ये झालेल्या घटनाक्रमाची चौकशी करून दोषी आणि बेपर्वाई करणाऱया पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करावी, याचा समावेश आहे. प्रशासनाने या मागण्यांना लिखित मंजुरी मिळाल्यानंतर तिवारी यांच्या मृतदेहावर त्यांच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्कार केले.

ABOUT THE AUTHOR

...view details