नवी दिल्ली - हरियाणात सरकारी भरतीत मोठा घोटाळा झाला आहे. या भरतीत मोठ्या प्रमाणात विसंगती आहेत. यामुळे सर्व भरती झालेल्या उमेदवारांच्या गुणांची तपासणी झाली पाहिजे आणि निकाल सार्वजनिकरित्या जाहीर केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
हरियाणाच्या सरकारी नोकर भरतीत मोठा घोटाळा - रणदीप सुरजेवाला
भाजप सरकार खरे असेल तर त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या २२ मे २०१४ च्या निकालानुसार लेखी परीक्षेत आणि मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे गुण सार्वजनिकरित्या जाहीर केले पाहिजेत, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.
सुरजेवाला म्हणाले, हरियाणाच्या युवकांचे भविष्य अंधारात आहे. भाजप सरकार खरे असेल तर त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या २२ मे २०१४ च्या निकालानुसार लेखी परीक्षेत आणि मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांचे गुण सार्वजनिकरित्या जाहीर केले पाहिजेत.
हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भर्तीत चौकशी करण्यासाठी सरकार जाणूनबुजून उशीर करत आहे. त्यांनी अटक झालेल्या हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कर्मचाऱ्यांच्या कॉल रिकॉर्डिंगवर स्पष्टिकरण द्यावे, अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली.