महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

UPSC परिक्षेची तयारी करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद - muslim

सरकारने यूपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ केली असून आता त्यासाठी 20 कोटी रुपये दिले जाणार आहेत. याचा फायदा स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांना होणार आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतने राजनितिक विशेषज्ञ जैनब सिकंदर यांच्याशी संवाद साधला.

राजनितिक तज्ञ जैनब सिकंदर

By

Published : Jul 7, 2019, 5:13 PM IST

नवी दिल्ली- यूपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी सरकारने अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. सरकारने यूपीएससी, एसएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ केली असून आता त्यासाठी 20 कोटी रुपये दिले जाणार आहेत. याचा फायदा स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मुस्लीम विद्यार्थ्यांना होणार आहे. मात्र, सरकारने प्री-मेट्रिक आणि पोस्ट-मॅट्रिक विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये कपात केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक मंत्रालयासाठी 4599 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राजनितिक विशेषज्ञ जैनब सिकंदर
अल्पसंख्याक मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या बजेटविषयी ईटीव्ही भारतने राजनीतिक विशेषज्ञ जैनब सिकंदर यांच्याशी संवाद साधला. सरकारने दिलेल्या बजेटचा अल्पसंख्याकांना किती फायदा झाला हे बजेटचा उपयोग योग्य रीतीने झाला आहे का यावर अवलंबून असणार आहे. तसेच विविध योजनांचा लाभ अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचल्या नंतर त्यावरुन बजेटचे मुल्यांकन करता येईल, असे त्या म्हणाल्या. बजेटमध्ये दिसणारा आकडा महत्त्वाचा नसून सरकारच्या योजना किती प्रमाणात लागू झाल्या आणि अल्पसंख्याकांचा किती विकास झाला हे पाहणं महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.यूपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतूदीवर जैनब सिकंदर यांनी भाष्य केले. त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 10 वी व 12 वी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेत येण्यास मदत होईल. तसेच प्रशासकीय सेवेत मुस्लीमांची टक्केवारी वाढेल, असे त्या म्हणाल्या.सरकारने अल्पसंख्याक महिलांसाठी असणाऱ्या नेतृत्व विकास योजनेतील बजेटमध्ये कपात केली आहे. यावरही सिकंदर यांनी प्रतिक्रिया दिली. जोपर्यंत विद्यार्थींनी प्राथमिक आणि इंटरमीडियट परिक्षा पास होत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी अशा योजनांचा काहीच फायदा नाही, असे त्या म्हणाल्या.सरकारने प्री-मेट्रिक आणि पोस्ट-मॅट्रिकसाठी यावर्षी 1208 आणि 496 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागच्यावर्षी सरकारने यासाठी 1296 आणि 500 कोटींची तरतूद केली होती.यूपीएससी परिक्षेमध्ये यावर्षी 131 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात 50 मुस्लीम समाजातील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details