महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 7, 2019, 1:48 PM IST

ETV Bharat / bharat

लँडर विक्रम 'क्रॅश' झालेले नाही, ऑर्बिटर आणि लँडरदरम्यान संपर्क अद्यापही कायम - माजी इस्रो संचालक

'विक्रम लँडरशी संपर्क तुटला आहे. मात्र, तो 'क्रॅश' झालेला नसल्याचीही शक्यता आहे. कारण, सध्या चंद्राभोवती फिरणारा ऑर्बिटर आणि विक्रम लँडर यांच्यादरम्यान अद्यापही संपर्क सुरू आहे. याचा अर्थ ते (विक्रम लँडर) शाबूत असले पाहिजे,' असे शशीकुमार यांनी म्हटले आहे.

इस्रोचे माजी संचालक शशीकुमार

त्रिवेंद्रम -माजी इस्रो संचालक डी. शशीकुमार यांनी शनिवारी चांद्रयान- २ मधील विक्रम लँडर 'क्रॅश' झाले नसल्याची शक्यता वर्तवली आहे. 'विक्रम लँडरशी संपर्क तुटला आहे. मात्र, तो 'क्रॅश' झालेला नसल्याचीही शक्यता आहे,' असे शशीकुमार यांनी म्हटले आहे.

'आम्हाला कम्युनिकेशन डेटामधून विक्रमचे सॉफ्ट लँडिंग झाले की क्रॅश लँडिंग झाले, हे शोधावे लागेल. माझ्या मते, हे क्रॅश लँडिंग नसावे. कारण, सध्या चंद्राभोवती फिरणारा ऑर्बिटर आणि विक्रम लँडर यांच्यादरम्यान अद्यापही संपर्क सुरू आहे. याचा अर्थ ते (विक्रम लँडर) शाबूत असले पाहिजे. त्यामुळे याचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतरच नक्की काय घडले आहे, हे समजू शकेल, अशी आशा आपण करूया,' असे शशीकुमार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Chandrayaan-2 : 'चांद्रयान-२'चा चित्तथरारक प्रवास...

नेमकी काय गफलत झाली आहे, याचे सध्या कम्युनिकेशन डेटावरून विश्लेषण सुरू आहे, असे ते म्हणाले. याआधी इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) 'चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरच्या उंचीवर पोहोचेपर्यंत विक्रम लँडरचा व्यवस्थितपणे क्रियाशील होता. त्यानंतर जमिनीवरील स्थानकाचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला. विविध माहितीचे विश्लेषण केले जात आहे,' असे ट्विट केले होते.

२ स्पटेंबरला चांद्रयान-२ ऑर्बिटरपासून विक्रम लँडर यशस्वीरीत्या वेगळा झाला. ऑर्बिटर अजूनही चंद्राभेवती परिभ्रमण करत आहे.

विक्रम लँडरला शुक्रवार-शनिवारदरम्यानच्या रात्री दीड ते अडीचदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करण्याचे नियोजित केले होते. यानंतर रोव्हर प्रज्ञान शनिवारी पहाटे साडेपाच-साडेसहाच्या दरम्यान विक्रम लँडरमधून बाहेर पडणार होते.

हेही वाचा - Chandrayaan 2: इस्रोचे प्रमुख सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधानांनी केले सांत्वन

पृथ्वीच्या कक्षेत जवळजवळ २३ दिवस फिरल्यानंतर चांद्रयानाने १४ ऑगस्टला चंद्राच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली होती. चांद्रयान - २ मोहिमेला २२ जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून सुरुवात झाली होती. भारताच्या दुसऱ्या चांद्रमोहिमेला मंत्रिमंडळाने सप्टेंबर २००८ ला मंजुरी दिली होती. चांद्रयान - १ लाँच होण्याच्या काही दिवस आधी ही मंजुरी मिळाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details