पाटणा - बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाची स्थापना १९९७ मध्ये झाली होती. स्थापनेनंतर लालूंनी पक्षाला यशाच्या शिखरावर नेले. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत पक्ष सध्या सर्वात वाईट परस्थितीतून जात आहे. याचे उदाहरण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.
आरजेडी स्थापन झाल्यापासून सर्वात कमी जागांवर पक्षाने उमेदवार दिले होते. मात्र, पक्षाला सर्वात कमी म्हणजे १५.३६ टक्केच मतदान झाले. याविषयी पक्ष विचार मंथन करणार आहे. मात्र, त्याच्या आधीच प्रताप सिंह यांनी जनता दरबार भरवण्याची घोषणा करुन पक्षासमोरच्या अडचणीमध्ये वाढ केली आहे.
महागठबंधनची परिस्थिती वाईट -
लालू प्रसाद यांच्या अनुपस्थितीत यावेळी लोकसभा निवडणूक लढवली गेली. तेजस्वी यादव महागठबंधनचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली. महागठबंधनला १ जागा जिंकता आली. ती जागा सुध्दा काँग्रेसने जिंकलेली आहे. मात्र, आरजेडी, रालोसपा आणि वीआईपी या पक्षांना खातेही खोलता आले नाही.
आरजेडीला खातेही खोलता आले नाही -