रांची - जनता दल (युनायटेड)च्या एका आमदाराच्या हत्येचा आरोप असलेला, आणि २०१७ मध्ये पोलिसांना शरण आलेला नक्षलवादी कुंदन पहान हा झारखंडची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्याच्या वकिलाने ही माहिती दिली आहे.
पहान याचे वकील ईश्वर दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पहान याला निवडणूक लढवता यावी यासाठी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती मान्य करत, पहान याला झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यास हिरवा कंदील दिला आहे.