नवी दिल्ली -स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर चार विमान कंपन्यांकडून प्रवासबंदी घालण्यात आली आहे. विमान कंपनी इंडिगोनं त्याच्यावर सहा महिन्यांची तर एअर इंडियानं त्याच्या विमान प्रवासावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. त्यावर आज कुणाल कामराने इंडिगो विमान कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
कुणाल कामराने इंडिगो विमान कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून त्याच्यावर लावलेली सहा महिन्यांची प्रवास बंदी हटवण्याची मागणी केली. विनाशर्त माफी आणि 25 लाख रुपये नुकसान भरपाई मागितली आहे. दरम्यान या नोटीसवर अद्याप इंडिगो विमान कंपनीकडून कोणतेच उत्तर आले नाही.