नवी दिल्ली - कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच, 'कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराविषयी सर्व बाबी समझोत्याने सोडवल्या जातील,' असेही ते म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट - prime minister
'मंत्रिमंडळ विस्तार हा राजकीय मुद्दा आहे. त्याविषयी काळजी करण्याचे कारण नाही. सर्व बाबी समझोत्याने सोडवल्या जातील,' असे कुमारस्वामी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
'मंत्रिमंडळ विस्तार हा राजकीय मुद्दा आहे. त्याविषयी काळजी करण्याचे कारण नाही. सर्व बाबी समझोत्याने सोडवल्या जातील,' असे कुमारस्वामी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेसचे आघाडी सरकार आहे. त्यांच्या आघाडीमध्ये समस्या निर्माण झाल्याने कर्नाटकातील राज्य सरकार अस्थिर झाले होते. यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करून २ अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याचा पर्याय अवलंबण्यात आला आहे.
नवे मंत्री आर. शंकर आणि एच. नागेश यांना कर्नाकटचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी गुपत्तेची शपथ दिली. या वेळी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि इतर काहीजण उपस्थित होते.
कर्नाटकात भाजप १०५ जागांसह सर्वांत मोठा पक्ष आहे. मात्र, २२५ सदस्यांच्या विधानसभेसाठी बहुमत सिद्ध न करू शकल्याने जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाले. जेडीएस आणि काँग्रेसने संयुक्तपणे ११७ आमदारांसह बहुमताचा आकडा पार केला होता. यामध्ये काँग्रेसचे ७९ आणि जेडीएसचे ३७ आणि बसपचा १ आमदार आहे.