महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'देशाचा गर्व करणे सोडा जगणेही अवघड होऊन जाईल', उन्नाव पीडितेच्या अपघातावर कुमार विश्वास यांचे ट्वीट - सरकार

पक्षांनी नेते, विचारधारा आणि इतर गोष्टींना सोडून देशातील कायदा-व्यवस्थेविषयी विचार केला पाहिजे, असे ट्वीट कुमार विश्वास यांनी केले आहे. तर, प्रियांका गांधीही भाजपवर ट्वीट करताना अनेक प्रश्न विचारले आहेत.

प्रियांका गांधी आणि कुमार विश्वास

By

Published : Jul 29, 2019, 6:22 PM IST

नवी दिल्ली -उन्नाव प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर बलात्काराचे आरोप लावणारी पीडिता गंभीररित्या जखमी झाली आहे. तर, पीडितेची काकू, मावशी आणि कारचालकांचा मृत्यू झाला आहे. रायबरेलीतील गुरबख्श गंज परिसरात काल (रविवारी) ट्रकने पीडितेच्या कारला धडक दिली होती.

पीडितेच्या आईने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की अपघातामागे आमदारांच्या माणसांचा हात आहे, याची आम्हाला माहिती मिळाली आहे. मागील काही दिवसापासून आम्हाला धमक्या मिळत होत्या. न्यायालयात गेल्यावरती आमदाराकडील काही लोक धमकावताना आम्हाला म्हणायचे, आमदार जेलमध्ये असला तरीही काही फरक पडणार नाही. कारण, आमदारांची माणसे बाहेर आहेत. आमदार जेलमध्ये फोनचा वापर करत होता. याबाबतीत सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे.

कुमार विश्वास यांनी याबाबत ट्वीट करताना म्हटले आहे, की उन्नावमध्ये झालेली घटना समाज-राजकारण घुसखोरी करणाऱ्या खूप खराब वातावरणाची सुरुवात आहे. पक्षांनी नेते, विचारधारा आणि इतर गोष्टींना सोडून देशातील कायदा-व्यवस्थेविषयी विचार केला पाहिजे. नाहीतर अशी परिस्थिती निर्माण होईल, की देशाचा गर्व करणे तर दुरच पण येथे राहणेसुद्धा अवघड होऊन जाईल.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही उन्नाव येथे घडलेल्या अपघाताबद्दल ट्वीट करताना शंका उपस्थित केली आहे. प्रियांका गांधीनी लिहिले आहे, की बलात्कार पीडितेसोबत झालेला अपघात आश्चर्यचकीत करणारा आहे. बलात्काराच्या प्रकरणातील सीबीआय चौकशीची काय परिस्थिती आहे. आरोपी आमदार अजूनही भाजपमध्ये कसा काय आहे, पीडितेच्या सुरक्षेबाबत हाराकिरी का केली जात आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे भाजप सरकार देत नाही तोपर्यंत सरकारकडून न्याय मिळण्याची कोणतीही अपेक्षा नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details